कठीण प्रसंगाचा सामना आत्मविश्वासाने केल्यास यश निश्चित - प्राचार्य कैलाश करांडे

पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथाँन २०२० " स्पर्धेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे समोर सहभागी विद्यार्थी.
Pandharpur Live -

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज मध्ये 
"सिंहगड हॅकॅथाँन-२०२०" स्पर्धा
    पंढरपूर (प्रतिनिधी) आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा खुप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचे असेल तर स्पर्धेच्या युगात एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण केले पाहिजे. मेहनत करण्याची तयारीधमक तुमच्यात असली पाहिजे आणि जे काम करीत आहात त्या कामात किती ही अडचणी आल्या तरी तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्याचा सामना केला पाहिजे. ध्येय पुर्तीसाठी कठीण परिश्रम व नियोजनपूर्वक अभ्यास केल्यावर तुम्ही आयुष्यात नक्की च यशस्वी व्हाल. असे मत प्राचार्य डॉ कैलाश करांडे हॅकॅथाँन २०२० या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
         कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात भारत सरकारच्या हॅकॅथाँन २०२० या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील "प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग" या नाव लौकिक मिळविलेल्या उपक्रमाअंतर्गत हॅकॅथाँन २०२० या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सलग २४ तास प्रोग्रॅम करून समाज उपयोगी सॉफ्टवेअर बनविण्याचे स्वप्न अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी उराशी बाळगले आहे. या स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
      या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विट्स रिचर्स लॅब जोहान्सबर्ग साऊथ अफ्रिका या कंपनीत कार्यरत असलेले रणजित स्वामी हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेचे समन्वयक प्रा. विरेंद्रकुमार धोत्रे सह विद्यार्थी प्रतिनिधी रोहित मिसाळ हे काम पाहत आहेत. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, सुभाष पिंगळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी २४ तास उपस्थित राहून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करणार आहेत. दरम्यान काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    या स्पर्धेमध्ये प्रा. महेश कुलकर्णी हे एक तास योगा घेणार आहेत. हॅकॅथाँन २०२० स्पर्धेतील प्रथम बक्षीस हे सिंहगडच्या माजी विद्यार्थ्याकडून दहा हजार रुपये तर द्वितिय बक्षीस सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडून सात हजार रुपयेचे रोख रक्कम व सन्मानचिन्ह हे विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
   हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी वैभवी कुलकर्णी यांनी केले.