पंढरपूर सिंहगड मध्ये 'भारतीय संरक्षण सिध्दता' या विषयावर व्याख्यान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 17 February 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये 'भारतीय संरक्षण सिध्दता' या विषयावर व्याख्यान


पंढरपूर सिंहगड मध्ये मध्ये व्याख्याते डाॅ. काशिनाथ देवधर यांचा सन्मान करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आदी.  
Pandharpur Live-

पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी (ता. पंढरपूर) महाविद्यालयात दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी डाॅ. काशिनाथ देवधर यांचे "भारतीय संरक्षण सिध्दता" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
         या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, व्याख्याते डाॅ. काशिनाथ देवधर, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी आदी सह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
             यावेळी महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. काशिनाथ देवधर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
                      यावेळी डाॅ. काशिनाथ देवधर यांनी भारतीय सैन्य दलातील जीवन प्रवास याविषयी माहिती दिली. भारतीय सैन्य दलात स्वतःचे तंञज्ञान तसेच युद्धात १००% भारतीय शस्ञ असली पाहिजे. विवेकानंद यांनी सांगितले आहे. आपण स्वतः स्वावलंबी झाले पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ. पुर्वीच्या काळात युद्धासाठी वापरली जाणारी शस्ञ यांची माहिती
                        पृथ्वीचा विनाश होऊ नये म्हणून काय उपाय आखले पाहिजे याबाबत माहिती दिली. डाॅ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होत आहे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय सैन्य दलातील एका व्यक्तीने वापरण्याची शस्ञे, स्वदेशी तंत्रज्ञानाची आज गरज, युद्ध करताना कमी वजनाचे शस्ञ आणि देशासाठी २४ तास काम करणा-या जवानांना अद्ययावत सुविधा दिल्या पाहिजेत असे मत त्यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
            हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


add