पंढरपूर सिंहगड मध्ये ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल’ या विषावर व्याखान - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 5 February 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल’ या विषावर व्याखान


Pandharpur Live- 
         पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग विभातील विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील कार्पोरेट ट्रेनर आनंद ठकर यांचे ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
       या व्याख्यानाच्या सुरवातीला व्याख्याते आनंद ठकर यांचे महाविद्यालयाच्या वतीने मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. या व्याख्यानामध्ये महाविद्यालयातील द्वितीय आणि तृतीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंद ठकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना आनंद ठकर म्हणाले, अलीकडच्या काळात पारंपारिक सौरउर्जेचा वापर खूप कमी प्रमणा होत आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पारंपारिक उर्जास्त्रोतांना  पर्याय म्हणून इलेक्ट्रिकल वाहनांचा पर्याय येत आहे. इलेक्ट्रिकल वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषण खूप कमी प्रमाणात होते. भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी स्वच्छ पर्यावरणपूरक वाहने उत्पादित करण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. इलेक्ट्रिकल वाहन निर्मितीमध्ये अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. असे मत आनंद ठकर यांनी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.
    या व्याख्यानामध्ये महाविद्यालयातील २५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयातील डॉ. शाम कुलकर्णी व प्रा. बाळासाहेब गंधारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. प्रसाद कुलकर्णी सह अनेक शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages