पंढरपूर सिंहगड मध्ये "जलसंपदा विभागातील कामाचे स्वरूप व कर्तव्ये" या विषयावर माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 7 February 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये "जलसंपदा विभागातील कामाचे स्वरूप व कर्तव्ये" या विषयावर माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन.  सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थांसाठी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  *'माजी विद्यार्थ्यांशी संवाद'* या महाविद्यालयाच्या उपक्रमांअंतर्गत *"जलसंपदा विभागामधील कामाचे स्वरूप व कर्तव्ये"* या  विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या लघु पाटबंधारे उपविभाग, पंढरपूर, जलसंपदा विभागा मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री प्रितम चोरडे यांच्या चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले  होते.
या सत्राच्या प्रारंभी प्रितम चोरडे  यांचे स्वागत व सत्कार सिव्हिल इंजिनिअरींग विभागप्रमुख डॉ. चेतन पिसे यांच्या हस्ते व प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा.गणेश लकडे, प्रा.अमोल कांबळे , प्रा.संगमनाथ उप्पीन यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.

या सत्राची सुरुवात करताना प्रितम चोरडे म्हणाले कि,  'सिंहगड-पंढरपूर' मधील टिचींग लर्निंग  पध्दती व येथील प्राचार्य कैलास करांडे यांच्यासह सर्व प्राध्यापक माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाचे उदिष्ठे पुर्ण करण्यासाठी घेत असलेल्या श्रमाचे चीज करण्याची संधी माझ्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांना मिळत आहे त्याबद्दल सिंहगड परिवाराचे मनःपुर्वक आभार मानतो.

प्रितम चोरडे यांनी पाटबंधारे विभागातील कामकाजाचे स्वरूप व विविध स्तरावरील अधिकारी वर्गाची कार्यकारी कर्तव्ये यांच्या संदर्भात व्यापक माहिती दिली.
त्यानंतर शासनाच्या विविध प्रकारच्या पदांसाठी होणाऱ्या परीक्षांच्या तयारीबद्दल विद्यार्थ्यांना त्यांना आलेल्या स्वानुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले

या सत्राचे समन्वयक म्हणून प्रा. अमोल कांबळे यांनी काम पाहिले .तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संगमनाथ उप्पीन यांनी केले तर प्रा.गणेश लकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages