पंढरपूर सिंहगड मध्ये 'स्टॅड-प्रो सॉफ्टवेअर वरील कार्यशाळा संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 4 February 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये 'स्टॅड-प्रो सॉफ्टवेअर वरील कार्यशाळा संपन्न

सिंहगड मध्ये व्हल्यूडिशन प्रोग्रॅम मध्ये माहिती देताना प्राध्यापक
Pandharpur Live - 

पंढरपूर सिंहगड मध्ये 'स्टॅड-प्रो सॉफ्टवेअर वरील कार्यशाळा संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी 'स्टॅड-प्रो. सॉफ्टवेअरची कार्यशाळा' आयोजित करण्यात आला होती. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

ही कार्यशाळा पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात २५ जानेवारी ते २६ जानेवारी आणि ३१ जानेवारी तसेच १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत  ''स्टॅड-प्रो. सॉफ्टवेअरवर कार्यशाळा" आयोजित करण्यात आली होती
   यावेळी सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिकता आणि नवीन शोध पाहता विद्यार्थ्यांना आधुनिक सॉफ्टवेअर शिकणे आणि अंगीकारणे ही काळाची गरज आहे, यासाठी स्थापत्य विभागाने ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केला होता. या कार्यशाळेत सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ६० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.


       

  ही कार्यशाळा सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी  प्रा. महेश शिंदे, प्रा. दिग्विजय जगताप, प्रा. मुरलीधर कुलकर्णी आदी सह सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages