“महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय ग्रेड रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनचा १०० टक्के निकाल”

यशस्वी विद्यार्थ्यासमवेत प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर व कला शिक्षक नारायण कुलकर्णी
पंढरपूर लाईव्ह- महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन चा निकाल शंभर टक्के लागला असून या एलिमेंटरी परीक्षेमध्ये आर्यन विजयकुमार कराळे ए-ग्रेड, श्रद्धा सोमनाथ गाजरे बी-ग्रेड, प्रणिता नवनाथ गोरे बी-ग्रेड, अद्वैत संतोष माने बी-ग्रेड, श्रवण देविदास नागणे बी-ग्रेड तर मधुरा रविंद्र शिंदे बी-ग्रेड मिळवून चित्रकलेमध्ये यश संपादन केले.

एलिमेंटरी परीक्षेसाठी १८ व इंटरमिजिएट परीक्षेसाठी ७ विद्यार्थी बसले होते. या सर्वांना प्रशालेचे कलाशिक्षक  नारायण कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या प्राचार्या सौ. शैला करणेकर, रजिस्ट्रार गणेश वाळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.