स्वतःचे स्किल वापरून व्यवसाय सुरू करा - नितीन काळे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 1 February 2020

स्वतःचे स्किल वापरून व्यवसाय सुरू करा - नितीन काळे


○ पंढरपूर सिंहगड मध्ये "उद्योजक विकास" या विषयावर व्याख्यान
पंढरपूर सिंहगड मध्ये व्याख्याते नितीन काळे याचा यांचा सन्मान करताना कु. मल्टी संतानी,  प्रा. सोमनाथ ठिंगळे आदी.
पंढरपूर लाईव्ह- आयुष्यात यशस्वी व मोठा उद्योजक व्हायचं असेल तर समाजातील समस्या शोधुन त्या समस्या सोडविण्यासाठी स्वतःचे स्किलचा वापर करून उद्योजक बना. शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर करून आवश्यक असलेल्या छोट्या-छोट्या अनेक गोष्टी आपल्या खुप मोठ्या व्यवसायाच्या संधी देत असतात. भारतात अनेक इंजिनिअर्स तयार होतात आणि भारतातील इंजिनिअर्स च्या ज्ञानाचा फायदा इतर देशातील अनेक नामांकित कंपन्या फायदा घेतात. इंजिनिअरींगचे शिक्षण फक्त इंजिनिअरींगची डिग्री मिळवायची आहे म्हणून घेऊ नका. त्या डिग्री चा फायदा स्वतःकडे असलेल्या स्किलचा  वापर करून उद्योग उभा करून अनेक हातांना काम दिले पाहिजे. 

व्यवसाय करायचा असेल तर वेळ, पैसा याची योग्य पद्धतीने नियोजन केले पाहिजे आणि नव-नवीन प्राॅडक्टची निर्मिती करून ते बाजारात आणून तुम्ही लोकांसाठी मोठा प्लाटफाॅर्म तयार करू शकता. यासाठी तुमची इच्छा शक्ती तीव्र असली पाहिजे या शिवाय आत्मविश्वास प्रबळ असला पाहिजे तरच तुम्ही स्वतःच्या हिंमतीने हटके उद्योजक व्हाल. असे मत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितिन काळे यांनी बोलताना व्यक्त केले.

  कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील तृतीय वर्षात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "उद्योजकता विकास" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने कु. मल्टी संतानी व प्रा. सोमनाथ ठिंगळे यांच्या हस्ते नितीन काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
    या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन कु. किरण संतानी हिने केले.

No comments:

Post a Comment

Pages