पंढरपूर सिंहगड मध्ये टेक महिंद्रा कंपनीसाठी मुलाखतीचे आयोजन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 6 February 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये टेक महिंद्रा कंपनीसाठी मुलाखतीचे आयोजन
○ विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातुन १ हजारांहून अधिक विद्यार्थी राहणार उपस्थित

○ १२ तज्ञांकडून होणार मुलाखती

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी  (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२० या दिवशी जागतिक बहुराष्ट्रीय, आय.टी. कंपनी, टेक महिंद्रा पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात येणार आहे. या कंपनीसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींगचे २०२० मध्ये पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी सहभागी घेऊ शकतात.
 या कंपनीत निवड करण्यासाठी १२ तज्ञांचे पथक पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी यामध्ये  सहभागी होण्याचे आवाहन सिंहगड संस्थेचे प्लेसमेन्ट डीन प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी केले आहे.
     पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातुन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या मध्ये १ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असुन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने अॅप्टीट्युड टेस्ट, निबंध लेखन, टेक्निकल टेस्ट, टेक्निकल मुलाखत, एचआर मुलाखत अशा पाच पद्धतीने निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात  प्रथमच बहुराष्ट्रीय कंपन्या येत आहेत. तरी कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील १० वी, १२ वी, अभियांत्रिकी, अॅग्रीटेक ६० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार असुन अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर ८३०८६१४८७५, ०२१८६-२५०१९३ या नंबर वर संपर्क साधावा. या कार्यक्रमासाठी सोलापूर व कोल्हापूर सह ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages