पंढरपूर तालुक्यातील 13 हजार 436 शेतकरी झाले कर्जमुक्त! प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 29 February 2020

पंढरपूर तालुक्यातील 13 हजार 436 शेतकरी झाले कर्जमुक्त! प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती


Pandharpur Live-


  पंढरपूर, दि. 29 :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना आहे. या योजनेतंर्गत याद्या जाहीर झाल्या असून, तालुक्यातील 13 हजार 436 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत  वाखरी येथील निकषपात्र  शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, विकास सोसायटी वाखरी येथे प्रांतधिकारी ढोले यांच्या हस्ते  प्रसिध्द करण्यात आल्या. यावेळी तहसिलदार वैशाली वाघमारे, सहाय्यक निबंधक  एस.एम तांदळे, जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे निरिक्षक मिलींद देशपांडे  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  
      यावेळी  प्रांतधिकारी  ढोले बोलताना म्हणाले, राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सेवा संस्थाचे अल्पमुदत पीक कर्ज माफ होणार आहे.  तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच विविध कार्यकारी सेवा संस्था येथे निकषपात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून, शेतकऱ्यांनी यादीतील क्रमांक, आधार कार्ड, बँक पास बुक घेवून त्यांनी आपले सरकार केंद्र, महाईसेवा केंद्र या ठिकाणी जावून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे तसेच प्रमाणिकरण केल्यानंतर त्यांना मिळालेली पावती घेवून जावे असे आवाहनही प्रांतधिकारी ढोले यांनी केले.
            निकषपात्र कर्जदारंची सर्व माहिती पोर्टलमध्ये समाविष्ठ केली आहे. कर्जमुक्तीच लाभ देताना निकषपात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचे सहाय्यक निबंधक एस.एम तांदळे यांनी सांगितले

add