सोलापूर-होटगी रोडवरील विमानतळ परिसरात आगीची झळ - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 4 February 2020

सोलापूर-होटगी रोडवरील विमानतळ परिसरात आगीची झळ

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
सोलापूर- होटगी रोडवरील विमानतळ परिसरातील वाळलेल्या गवताला आग लागली आणि ही आग पसरली. ही घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग विमानतळावरील सुमारे पाच एकर परिसरात पसरली होती अशी माहिती अग्निशामक प्रमुख केदार आवटे यांनी दिली.
होटगी रोडवरील विमानतळावरील गवताला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाचे जवानांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. वाळलेले गवत असल्याने काही वेळातच आगीने विमानतळावरील बरेच अंतर कवेत घेतले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीकडून सिगारेट किंवा काडी टाकल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून सुमारे 16 गाडी पाणी मारण्यात आले.  रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचेही आवटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages