धक्कादायक- मुलीने पळून जाऊन स्वतःचा संसार थाटला पण.... आई-वडिल व भावाने आपला जीवनप्रवास संपवला! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 11 February 2020

धक्कादायक- मुलीने पळून जाऊन स्वतःचा संसार थाटला पण.... आई-वडिल व भावाने आपला जीवनप्रवास संपवला!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुलीने घरातून पळुन जाऊन प्रियकरासोबत लग्न करत आपला संसार थाटला पण हा धक्का सहन न झाल्याने तिच्या आई-वडील व भावाने विहीरीत उडया घेऊन आत्महत्या करत आपला इहलोकीचा जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे. 

मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीतील आनंद नगर याठिकाणी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहे. या तिघांनीही त्यांच्या घरामागे असलेल्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

 सकाळी 11. 30 च्या सुमारास यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने मुलीच्या आई-वडिलांनी आणि भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एका शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीने आपण प्रेविवाह करणार असल्याची कल्पना दीड महिन्यापूर्वी घरी दिली. मात्र तिच्या घरून या विवाहाला विरोध करण्यात आला. यामुळे कुटुंबीयांनी विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे.

No comments:

Post a Comment

Pages