आनंदाची बातमी- हॉलिवूड बनवणार छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपट - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Friday, 14 February 2020

आनंदाची बातमी- हॉलिवूड बनवणार छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपट

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
राज्यभरातल्या शिवप्रेमींसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे . हॉलिवूडमधील एक नामवंत संस्था आणि केंद्र सरकार मिळून छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मार्टिनी फिल्म्स आणि पिंक जग्वार एंटरटेनमेंट या संस्थांनी शिवरायांवर चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं.

याचबरोबर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरही ही कंपनी बायोपिक बनवणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या बायोपिकचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला. 'एपीजे अब्दुल कलाम : द मिसाईल मॅन' असं या बायोपिकचं नाव आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. याद्वारे भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. या वर्ष अखेरपर्यंत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा निर्धार आहे.

हॉलिवूड निर्माता जॉनी मार्टिन व जगदीश दान हे चित्रपटाचे निर्माते आहेत.जावडेकर यांनी सांगितले, की हॉलिवूड व टॉलिवूडच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारणाऱ्या या चित्रपटाबरोबर अन्य चार चित्रपटांचीही निर्मिती करण्यात येईल. यात शिवरायांवर आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्या वरील चित्रपटांचाही समावेश असेल. यातून एक अब्ज डॉलर इतकी गुंतवणूकही देशात होणार आहे.

Ad