लेखी आश्वासनानंतर हिंगणघाट पीडितेवर अंत्यसंस्कार... ग्रामस्थांचे कंठ दाटले... डोळे पाणावले - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Tuesday, 11 February 2020

लेखी आश्वासनानंतर हिंगणघाट पीडितेवर अंत्यसंस्कार... ग्रामस्थांचे कंठ दाटले... डोळे पाणावलेपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. तसेच पिडीतेच्या भावाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येईल,असे वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी लेखी लिहून दिले. यानंतर हिंगणघाट जळीत प्रकरणातील प्राध्यापिकेवर काल संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या गावातील ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी तिला अत्यंत दु:खद अंतःकरणाने निरोप दिला. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि काल सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला होता.

तिच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या कुटुंबियांसह महाराष्ट्रातील जनतेलाही अश्रू अनावर झाले. हिंगणघाटच्या लेकीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्यात आला. तेव्हा नागरिकांनी विविध मागण्या ठेवत अंतिम संस्कार थांबवले होते. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे अंत्यसंस्कार करण्यात आले.


Ad