पंढरीतील 'या' प्रमुख विकासकामांना वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सुचना

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुरु असलेली कामे वेळेत पुर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सुचना दिल्या आहेत. यमाई तलाव, कोर्टी वाखरी बाह्यवळण रस्ता, भीमा नदीवर नवीन पुल उभारणे, नवीन विश्रामगृह बांधणे, विष्णूपद बंधारा येथे घाट उभारणे आदी कामांबाबत चर्चा झाली. 

जी कामे सुरु आहेत ती कामे नियोजित वेळेत पुर्ण करण्यात यावीत. ज्या कामांना जागेची आवश्यकता आहे, त्यासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. भूसंपादन करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया संबंधित अधिकारी यांनी करावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

विविध विकास कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बाबत आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जलसंपदा विभागांचें अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, क्षमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागांचें कार्यकारी अभियंता पी.जी. चव्हाण, अनिल ढेपे, जलसंपदा विभागांचें कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, भूसंपादन अधिकारी शैलेश सुर्यवंशी, महावितरण कंपनीचे नंदकुमार सोनंदकर, आर्किटेक्ट किरण कलमदाणी, विद्युत विभागांचें तौसिफ दारुवाले आदी उपस्थित होते.