राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा जळगाव दौरा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 28 February 2020

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा जळगाव दौरा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहे. शहरातील मु.जे.महाविद्यालय, बेंडाळे महिला महाविद्यालय येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित कार्यक्रम झाले. बेंडाळे महाविद्यालयात बोलतांना सुप्रिया सुळे यांनी जळगावच्या भरीतचे कौतुक केले. जळगावला येण्यामागे माझा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावचा भरीत खूप प्रसिद्ध असून बाहेरून कोणीही जळगावला आल्यावर भरीतचा आस्वाद घेतातच. जळगावला येऊन भरीत खाल्ले नाही तर काय खाल्ले? अशीच परिस्थिती होते. मी पक्षाच्या कामासाठी किंवा इतर कामांसाठी जळगावला येते, मात्र कामासोबत मी जळगावचा भरीत खाण्यासाठी देखील येते. 


संसदेतील माझ्या आवडत्या खासदारापैकी भाजपच्या रावेर लोकसभा मतदार संघातील रक्षा खडसे या आवडत्या खासदार अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे कौतुक केले.
त्या म्हणाल्या खासदार रक्षा खडसे या धडपड करणारे नेतृत्व असून त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटते.माझ्या आवडत्या खासदारापैकी त्या एक खासदार आहेत.

जळगावच्या मातीत वेगळेपण असून याठिकाणी खूप काही शिकायला मिळते. जळगावला आल्यावर मला नवीन गोष्ट शिकायला मिळते अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी जळगावचे कौतुक केले. शैक्षणिक बाबींवर मुंबई, पुण्यासारख्या शहराची बरोबरी जळगाव शहर करत असल्याचे अभिमान असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. महिलांना रोजगार देण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक उपक्रम राज्यात कोठेही नाही ते उपक्रम जळगाव शहरातील महाविद्यालयांमध्ये सुरु असल्याचे कौतुक आहे असेही त्यांनी सांगितले.

राजकारणात वैचारिक मतभेद असतात,पक्षही वेगळे आहेत. परंतु चांगल्या कामाचे कौतुक राजकारणापलीकडे जावून केले पाहिजे.हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे.पक्ष वेगळे असले तरी वैयक्तीक संबधात कधीही कटुता यायला नको.मात्र पाच वर्षात जेंव्हा निवडणूका होतील तेंव्हा त्यांच्या विरोधात जाहिर सभेत भाषण करू असे मतही त्यांनी व्यक्त केले.add