पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे भीमा नदीच्या पात्रात शिवजयंती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 19 February 2020

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे भीमा नदीच्या पात्रात शिवजयंती

कौठाळी  (सोमनाथ लोहार)-  कौठाळी (तालुका पंढरपूर )येथील भीमा नदी पात्रात शिवजयंतीनिमित्त प्रवीणनगरे व सुरज नगरे या दोन्ही बंधूंनी छत्रपती शिवरायांची अश्वारूढ तरंगती प्रतिकृती तयार केली असून पाहण्यासाठी परिसरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केलीआहे.

 शिवजयंती निमित्त कौठाळी गावांमध्ये वातावरण शिवमय झाले असून परिसरासह सर्व वाडी वस्ती, मराठी शाळा ,प्रमुख चौक या ठिकाणी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचबरोबर भीमा नदीपात्रामध्ये प्रवीण चंद्रकांत नगरे व सुरज माणिक नागरे या भोई समाजाच्या कलाकारांनी घोड्यावरती स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल आठ फूट उंच व सहा फूट लांबीची प्रतिकृती तयार केली आहे .अगदी हुबेहूब अश्वारूढ शिवरायाची प्रतिमा असल्यामुळे शिवराय नदीतून घोड्या वर धावले आल्याचा भास होत आहे .रिकामे पाण्याचे बॅरल च्या साह्याने नदीवर ती तरंगता झुला तयार करण्यात आला असून यावर अश्वारूढ शिवरायांचे स्थापना करण्यात आली आहे. भीमा नदीच्या मध्यभागी या  पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून शिवभक्तांना जाऊन दर्शन घेण्यासाठी होडीची सोय करण्यात आली. या होडी द्वारे शिवभक्तांना  तेथे नेऊन  दर्शन घडवून फेरी मारून परत आणून सोडले जात आहे .

या उपक्रमाचे कौठाळी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. शिवभक्तांना वाहतूक करणाऱ्या ओडीना भगवे झेंडे लावून नदीच्या किनाऱ्यावरती शिवचरित्र ,पोवाडा ,आधी स्पीकर ची सोय केल्यामुळे वातावरण शिवमय झाले आहे . यापूर्वीही या दोन्ही नगरे बंधूंनी भीमा नदी पात्र मध्ये तरंगते शिवस्मारक तरंगते रायगडाची प्रतिकृती  शिवसृष्टी आधी साकार केली होती त्याच बरोबर अकरा फूट उंचीचा शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बनवण्यात आला होता .तो कर्नाटक येथील शिवभक्तांनी निवड त्याची प्रतिष्ठापना केली तसेच छत्रपती संभाजी राजांचा ही अकरा फूट उंचीचा पुतळा बनवण्यात आला होता. त्या छत्रपती संभाजी राजांच्या पुतळ्याची हैदराबाद येथे ते सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली.

add