जि.प.प्रा.शाळा देशमुख वस्ती येथे 'बालआनंद बाजार डे' साजरा - 10 हजार रु.हून अधिक उलाढाल - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 8 February 2020

जि.प.प्रा.शाळा देशमुख वस्ती येथे 'बालआनंद बाजार डे' साजरा - 10 हजार रु.हून अधिक उलाढाल


करकंब (प्रतिनिधी):-  शैक्षणिक ज्ञानाबरोबर प्रत्यक्षात व्यवहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या  खरेदी-विक्री व्यवहारातून पैशांची देवाणघेवाण याची माहिती होण्यासाठी करकंब मधील जि.प.प्रा.शाळा देशमुख वस्ती येथे बजारडे चे आयोजन करण्यात आले होते.या बाजारामध्ये 10 हजार रुपयाहून अधिक उलाढाल झाली.     या बालआनंद बाजारडेचे उद्घाटन सरपंच आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हरिभाऊ देशमुख,गणपत देशमुख,शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,नागनाथ वाघमारे,काका देशमुख,अमोल देशमुख,नरहरी लोंढे यासह शिक्षक,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

add