“कर्मयोगी कॉलेज येथे “हायर प्रो-कन्सल्टींग पुणे” या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यूवचे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 19 February 2020

“कर्मयोगी कॉलेज येथे “हायर प्रो-कन्सल्टींग पुणे” या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यूवचे आयोजन

Pandharpur Live-
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे येथे हायर प्रो कन्सल्टींग पुणे
या कंपनीचे कॅम्पसचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची एप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली.

कॅम्पसला सोलापूर व इतर जिल्ह्यातील एकूण अकरा कॉलेजमधील ३९० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती
त्यापैकी ३४०विद्यार्थ्यांनी एप्टीट्यूड टेस्ट दिली. पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्पुटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांनी ही एप्टीट्यूड टेस्ट दिली.  कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, अवांतर वाचन, सामान्य ज्ञान, मुलाखतीसाठी आवश्यक असणाऱ्या सराव परीक्षा, संपूर्ण आत्मविश्वास याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यासाठी लागणारे पाठबळ व सहाय्य कर्मयोगी मार्फत
विद्यार्थ्यांना दिली जाते. नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य शिक्षण व एखाद्या नामवंत संस्थेमध्ये
कार्यरत असणे गरजेचे असते. या स्वप्नपूर्तीसाठी कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देत आहे. अल्पावधीतच सर्व स्तरावर लोकप्रिय झालेले हे कॉलेज शैक्षणिक, क्रीडा व प्लेसमेंट या क्षेत्रात विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

यावेळी कंपनीचे प्राचार्य डॉ कणसे म्हणाले की, कर्मयोगी नेहमीच अशा इंटरव्हुव अंतर्गत विद्यार्थ्यांना
नोकरीची संधी उपलब्ध करुन देते, यासाठी संस्था सदैव तत्पर आहे. या कॅम्पस आयोजनासाठी कंपनीचे एच.आर. मा.श्री. विकास शुक्ला यांनी प्राचार्य डॉ ए.बी.कणसे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.खिस्ते आर.आर.यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. शेख एम एन. यांनी केले.

सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी केले व सर्व
विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.ए. बी कणसे, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

add