किल्ले सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराज यांचा जयंती सोहळा संपन्न


Pandharpur Live-
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज जयंती सोहळा  राष्ट्रसेवा समूह च्या छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीने आयोजित केला होता.


कार्यक्रमाची सुरवात सकाळी 9 वाजता गडपूजनांने झाली, राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुलभाऊ पोकळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचे पूजन राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या अध्यक्षा स्मिताताई पोकळे  आणि महासंघाच्या महिला सदस्य यांच्या हस्ते झाले.  प्रमुख कार्यक्रमाद्वारे छत्रपती राजाराम महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला . यावेळी बोलताना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती राजाराम महाराज म्हणजे मुसद्दी, नीतिमान, राजकारधुरंधर आणि तेवढेच धैर्यवान राजा असल्याचे नमूद केले. यावेळी बोलताना कोकाटे यांनी इतिहासातील अनेक संदर्भ देऊन राजाराम महाराज यांच्या चाणाक्षनीती आणि निडर लढवय्या याची उदाहरणे दिली.

छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीच्या वतीने दिला जाणार छत्रपती राजाराम महाराज गौरव पुरस्कार सिंहगड किल्ल्यावर Ph.D. करणारे नंदकिशोर मते यांना प्रदान करण्यात आला. समितीच्या वतीने यावर्षी किल्ले सिंहगड ट्रेकिंग स्पर्धा घेण्यात आली होती त्यामधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली .

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना राहुल पोकळे यांनी छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना पोकळे म्हणाले की, "स्मारक समिती च्या वतीने राजाराम महाराज यांच्या समाधीच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा केला जाईल. येणाऱ्या काळामध्ये   छत्रपती राजाराम महाराज यांची चरित्र पुस्तक , फोटो आणि पुतळा प्रकाशित करण्यात येईल.टिळक बंगल्याची जागा परत सरकार जमा करावी."

या कार्यक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक विकास नाना दांगट ,अक्रूर   कुदळे,स्मिता पोकळे,अनिता ताई इंगळे,सौरभ मते,विलास मते,महेश कदम ,गोरख मुजुमले,विजय कोल्हे,दत्तात्रय नलावडे, पराग मते , रवीदादा ढमढेरे,राजाराम वाटाणे, लहू लांडगे तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समूहाचे प्रवक्ते उमेश शिंदे यांनी तर  प्रास्ताविक प्रा. औदुंबर लोंढे यांनी केले. विद्याधर थोपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रसेवा समूहाचे सर्व शाखा अध्यक्ष, कार्यकर्ते व छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीचे सदस्य यांनी कष्ट घेतले

Post a Comment

0 Comments