"अभियांत्रिकी महाविद्यालय बनवणारे विदयार्थी या संस्थेने दिले"- मानसी केसकर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 8 February 2020

"अभियांत्रिकी महाविद्यालय बनवणारे विदयार्थी या संस्थेने दिले"- मानसी केसकर

लोटेवाडीच्या संस्थेच्या वर्धापन दिन निमित्त बोलताना व्याख्याती मानसी केसकर उमेश परिचारक,
डॉ.दिलीप कुलकर्णी आदी.
कोर्टी ता.पंढरपूर येथे  वर्धापन दिन 
खर्डी- (अमोल कुलकर्णी) "अभियांत्रिकी महाविद्यालय बनवणारे  बीपी रोंगे सर आणि भाऊसाहेब रुपनर यांच्यासह हजारो  विद्यार्थी या संस्थेने घडवलेले विद्यार्थी आहेत. हे संस्थेचे कार्य कौतुकास पात्र आहे'' असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मानसी केसकर यांनी केलं.ग्रामीण भागात शिक्षण कार्य केलेल्या  सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी तालुका सांगोला या शिक्षण संस्थेचा बावन्नावा वर्धापन दिन नुतन विद्यालय कोर्टी येथे साजरा करण्‍यात आला.

 संस्थेच्या पंढरपूर तालुक्यात खर्डी,कोर्टी, सिद्धेवाडी, सांगोला तालुक्यातील लोटेवाडी,उदनवाडी, मेडशिंगी तर मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी,लवंगी आदी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि दोन वसतिगृह मधून चार हजार पेक्षा जास्त विदयार्थी शिक्षण घेत आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युटोपीयन शुभर चे चेअरमन उमेश परिचारक होते. प्रास्तविक संस्थेचे सचिव डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी केले.

यावेळी बोलताना उमेश परिचारक म्हणाले की  या शहरी भागातल्या शाळा लाखो रुपये डोनेशन देऊन सुटबुटातील शिक्षण घेण्यापेक्षा ग्रामीण भागात मोफत उत्तम शिक्षण मिळते आहे आणि शाळेत शाळाबाह्य संस्कार याचे शिक्षण मुलांना देणे हीच काळाची गरज आहे संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सांगोला  तालुका पंचायत समितीचे सभापती  सौ.राणी कोळवले म्हणाल्या की डॉक्टर वकील इंजिनियर होण्यापेक्षा ही उत्तम शेतकरी होणं ही सुद्धा काळाची गरज आहे.कार्यक्रम वेळी सांगोला पंचायत उपसभापती तानाजी चंदनशिवे,जेष्ठ नागरिक चिंतामणी हाके,संचाकल बाळासाहेब कुलकर्णी,उल्हास कुलकर्णी, अरुण शेंडे,विकास जाधव कुलकर्णी यांचे सह,पांडुरंग कारखाना संचालक अरुण घोलप,दादासो लवटे,मेजर पोपट वाघमारे आदी सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन  अमोल ढोपे यांनी केले तर मनोज कुलकर्णी सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे विद्यार्थी व गुणवंत शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला . नूतन विद्यालय कोर्टी चे मुख्याध्यापक एन.आय. वाघमारे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages