पंढरपूर तालुका, कृषी यशोगाथा- सेंद्रीय शेतीद्वारे तिसंगी येथील शेतकर्‍याचे बदलले जीवनमान... नारायण सदाशिव चोरमले ‘सेंद्रिय शेतीचा उगवता तारा’


Pandharpur Live -
शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडं पाठ फिरवलेली असतानाच सेंद्रीय शेतीद्वारे आपलं व आपल्या कुटूंबाचं जीवनमान उंचावणारा पंढरपूर तालुक्यातील सेंद्रीय शेतीचा उगवता तारा ठरलेल्या नारायण सदाशिव चोरमले या शेतकर्‍याची ही ‘यशोगाथा’ पंढरपूर लाईव्हचे तालुका प्रतिनिधी अशोक पवार यांच्या नजरेतून....

‘‘सेंद्रिय शेती म्हणजे जीवन जगण्याची नक्की हमी’’ या उक्तीद्वारे सेंद्रीय शेतीचा अवलंब करत  पंढरपूर तालुक्यातील मौजे तिसंगी येथील नारायण चोरमले या शेतकर्‍याने आपले संपुर्ण जीवनमान बदलवून दाखवले. 

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सर्व खर्च वजा जाता महिन्याला जर्सी गाईच्या दुधावर 50 हजार रुपये एवढा नफा मिळवलाय.  याच गायींचे शेणखताचा वापर आपल्या शेतातील ऊसाला करत सेंद्रिय खताच्या माध्यमातून ऊसाचे भरघोस उत्पन्न त्यांनी मिळवून दाखवले. 

 ‘‘शेतकर्‍याच्या छातीत धग आणि मनगटात रग असली की, कष्ट करायला आणि लढायला तो कधीच पाठीमागं बघत नाही.’’ त्यामुळंच शेतकर्‍याला त्याच्या बापानं रडायला नाही तर लढायला शिकवले! याचं जीवंत उदाहरण म्हणजेच नारायण चोरमले या शेतकर्‍यांनं सेंद्रीय शेतीचा केलेला प्रयोग! त्यांनी गरिबीवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पाच महिन्यात आपल्या हाताच्या मनगटा एवढ्या ऊसाच्या कांड्या काळ्या आईच्या कुशीत निर्माण केल्या. 

Post a Comment

0 Comments