पंढरपूर- शेततळ्यात पोहताना विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Wednesday, 12 February 2020

पंढरपूर- शेततळ्यात पोहताना विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू...Pandharpur Live-
पंढरपूर : शाळा सुटल्यानंर तीघे मित्र एका शेतातील तळ्यात पहिणयास गेले परंतु यापैकी एका विद्यार्थ्यास पोहताच येत नसल्यामुळे त्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी घडलीय.याबाबत पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार कोर्टी (ता.पंढरपूर) येथील शांतीनिकेतन गुरुकुल विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी कुबेर देठे (रा.टाकळी), अनुज शिंदे (रा.श्रीनगरी, पंढरपूर) व मुबीन नदाफ (रा. जुना कराड नाका, डॉ. भिंगे हॉस्पीटलमागे, पंढरपूर) हे तीघेजण विद्यालय सुटल्यानंतर टाकळी येथील देठे यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यास गेले.

तीघांपैकी मुबीन नदाफ यास पोहायला येत नव्हते तरीही मित्रांनी मनाई करुनही तो पोहण्यासाठी शेततळ्यात उतरला व पोहत असतानाच शेततळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्याचे मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु यात ते अपयश ठरले असल्याचे समजते. ही घटना आज दि. 12 फेबूवारी 2020 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटना समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला. मयत विद्याथ्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी (पोष्टमार्टेम) उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे सुरु असून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत असल्याचे समजते.

आज शांतीनिकेतन विद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता.      सदर विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर एका मित्राच्या घरी गेले व तिथून पुन्हा शेततळ्यावर गेले व ही दुर्घटना घडल्याचे समजते. मुबीन नदाफ या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Ad