लोणंद मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Friday, 28 February 2020

लोणंद मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहातPandharpur Live- लोणंद येथे शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खालीलप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले.
दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी  7:00 वाजता  धैर्यशील मोहिते-पाटील  (संस्थापक अध्यक्ष शिवामृत दूध संघ अकलूज व भाजपा नेते सोलापूर जिल्हा,) तसेच नातेपुते चे अमरशील देशमुख माजी सरपंच नातेपुते,     Ad.विजय काका पिसाळ नातेपुते,  हनुमंत साळुंखे (माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष), राजू पाटील (लोणंद),  सौ . जयश्रीताई खताळ सरपंच लोणंद, लोणंद शाळेचे मुख्याध्यापक श्री.खताळ सर,  माजी सरपंच बापू  जाधव, दत्तात्रय भगवानराव शिंदे, मुंबई महापौर केसरी  पै संग्राम भाऊ पोळ,  या मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन झाले. शिवप्रतिमा पूजन झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ होऊन,   Ad.विजय काका पिसाळ यांनी शिवाजी महाराजांचे विचार व्यक्त केले.

 संध्याकाळी 7:30  वाजता युवा शिवव्याख्याते संदीप आवताडे पाटील संभाजी नगर औरंगाबाद यांचे शिवचरित्र शिवाजी महाराजांचा वादळी इतिहास आपल्या पहाडी आवाजाने लोणंद व पंचक्रोशी दुमदुमून टाकली. 

कार्यक्रमाचे आयोजन  दादासाहेब  बोधले, यांनी शिवशक्ती   प्रतिष्ठानचे आयोजन करून व समस्त ग्रामस्थ लोणंद, यांच्यावतीने करण्यात आले होते,  शिवजयंती साजरी करण्यासाठी  लोणंदगावचे  बापूराव पोळ,  बोधले गुरुजी,  शिवाजी इंगळे,  महादेव इंगळे, रणजित देशमुख,   चि. किशोर कदम, प्रकाश जाधव,  रावसाहेब रुपनवर, 
कोंडीबा रुपनवर,  परशुराम गोरवे,  चि.महादेव केंगार सर, यांनी मोलाचे सहकार्य करून  लोणंद मध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महादेव खूडे सर  यांनी केले. 

Ad