सोलापूर जिल्हा : मौजे मोडनिंब, माढ्याला एमआयडीसी- आदिती तटकरे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 12 February 2020

सोलापूर जिल्हा : मौजे मोडनिंब, माढ्याला एमआयडीसी- आदिती तटकरे

PANDHARPUR LIVE- 
मुंबईदि. 11 : सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, करमाळा, केम व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यासाठी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश  उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज मंत्रालयात  आयोजित बैठकीत दिले.
यावेळी बैठकीत औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहीत धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावाअसेही यावेळी कुमारी तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सूभेदारउपअभियंता सुनिल चि. कोलप,भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages