माघ वारीनिमित्त पंढरपूर पोलिसांची सर्वत्र करडी नजर.... जाणुन घ्या कसा आहे बंदोबस्त! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 4 February 2020

माघ वारीनिमित्त पंढरपूर पोलिसांची सर्वत्र करडी नजर.... जाणुन घ्या कसा आहे बंदोबस्त!


Pandharpur Live- 
भुवैकुंठ पंढरी नगरीत माघ वारीचा प्रारंभ झाला आहे. भाविक भक्तांची गर्दी पंढरीत वाढत आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. चंद्रभागेचे वाळवंट, 65 एकर परिसर व पंढरपूर शहर साधु-संतांच्या मेळ्याने फुलेलेले आहे. या वारीत अनुचित घटना टाळण्यासाठी व ही वारी सुखद, शांततेत पार पडण्यासाठी पंढरपूर पोलिसांची मात्र सर्वत्र करडी नजर आहे.       

 एकुणच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण आवचर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पंढरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

माघ वारी निमित्त पोलिसांच्या चोख बंदोबस्ताची माहिती पोलिस प्रशासनाकडून प्रसिध्द केली आहे. 
  

No comments:

Post a Comment

Pages