माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 5 February 2020

माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न


कार्यकारी अधिकारी जोशी यांच्या हस्ते नित्यपूजा 
   पंढरपूर दि.05: माघी एकादशी  निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्निक केली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.


 माघी एकादशी  निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची काकडा आरती 4.00 वाजता झाली. त्यानंतर पहाटे 4.15 ते 5.15 या कालावधीत विठ्ठलाची नित्यपूजा श्री व सौ विठ्ठल जोशी यांनी केली.   मंदीर समितीच्या वतीने एकादशी निमित्त  पदस्पर्श दर्शन रांगेत उपवासाचे पदार्थ व मोफत चहापाण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली. 
  नित्यपूजेस मंदीर समितीचे सदस्य माधवी निगडे, शंकुतला नडगिरे व मंदीर समितीचे सल्लागार सदस्य सुनिल रुकारीउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडेमंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदीर समितीचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.


add