शरद पवार यांच्या हत्येचा कट... राष्ट्रवादी कार्यकर्त्याची पोलीस ठाण्यात तक्रार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 9 February 2020

शरद पवार यांच्या हत्येचा कट... राष्ट्रवादी कार्यकर्त्याची पोलीस ठाण्यात तक्रार

Pandharpur Live Online-
सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गलिच्छ भाषेत पोस्ट व्हायरल करून त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार याप्रकरणी तातडीने तपास करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण केले जात आहे.

त्यांच्या नावाच्या विविध पोस्ट व्हायरल करून जातीय तणाव भडकविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून पवारांविरुद्ध बॉम्बगोळ्यांच्या भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे सोशल मीडियावर दिसून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

add