महर्षी वाल्मिकी संघाचं शिवजयंतीदिनी अनोखं आंदोलन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 19 February 2020

महर्षी वाल्मिकी संघाचं शिवजयंतीदिनी अनोखं आंदोलन

Pandharpur Live-
शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं हिंगणघाट प्रकरणातील 
आरोपीच्या पुतळ्यास दिली जाहीर फाशी...

 पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पुजन केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं हिंगणघाट प्रकरणातील आरोपीच्या पुतळ्याला जाहीर फाशी देऊन महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं पंढरीत अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी हिंगणघाटमधील ताईला श्रध्दांजलीही अर्पण करण्यात आली.

हिंगणघाट येथील एका निष्पाप तरुणीला एका नराधमाने जीवंत जाळले. ही घटना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाला न शोभणारी आहे. या घटनेची निंदा करावी तेवढी कमीच आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी अद्यापही जिवंत आहे. ही घटना तर त्याहूनही लाजीरवाणी आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कदापीही सहन करुन घेतले जाणार नाही. सदर घटनेचा निषेध करत हिंगणघाट प्रकरणातील संबंधीत नराधम आरोपीस तात्काळ फाशी द्यावी या मागणी साठी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आज शिवछत्रपतींची जयंती साजरी केल्यानंतर त्यांच्या साक्षीनंच सदर प्रकरणातील आरोपीच्या पुतळ्यास फाशी दिली आहे. असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

यावेळी गणेश अंकुशराव, निलेश माने, बापु शिंदे, अमर बडवे, वैभव कांबळे, संपत सर्जे, विकी अभंगराव, किरण कोळी, बट्टेश्‍वर अभंगराव, रामा सुरवसे, प्रकाश मगर, अक्षय म्हेत्रे, विशाल कोताळकर, जयंत अभंगराव, सनी खंडागळे, श्रीकांत बळवंतकर, महेश माने,सुरज कांबळे, बालाजी कोळी, उमेश जाधव, प्रविण खंडागळे, सोमनाथ माळी, अभय अंकुशराव, वाल्मिकी अंकुशराव, अनिल कांबळे, रामा कांबळे, ओंकार तिवाडी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


add