मनसेच्या ९ तारखेच्या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार कार्यकर्ते जाणार-रोकडे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 6 February 2020

मनसेच्या ९ तारखेच्या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार कार्यकर्ते जाणार-रोकडे


प्रतिनिधी--पंढरपूर--बांगलादेशी मुसलमान व पाकिस्तानी मुसलमान या घुसखोरांना भारतातून हाकलण्यासाठी मनसे चा मोर्चा येत्या ९ फेब्रुवारी ला मुंबई येथे होणार असून  त्याबद्दल म.न.वि.से. सोलापुर जिल्हा संपर्क अध्यक्ष मा.विजय रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर मध्ये म.न.वि.से. च्या कार्यकर्त्यांची बैठक आज २ फेब्रुवारी रोजी पंढरपुर शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.सदर बैठकीत सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय रोकडे यांच्या उपस्थितीत  व  मनविसे जिल्हा संघटक सागर बडवे यांच्या नेतृत्वाखाली  अनेकांचा पक्षप्रवेश करण्यात आला,या बैठकीत संपर्क प्रमुख रोकडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातून कमीत कमी  ५ हजार कार्यकर्ते नेण्याचा शब्द सागर बडवे यांनी संपर्क प्रमुख विजय रोकडे यांना दिला आहे.

सदर बैठकीत सागर बडवे यांच्या कामाचे कौतुक संपर्क प्रमुख विजय रोकडे यांनी केले, व सोलापूर जिल्ह्यामधून आलेल्या ५ हजार कार्यकर्ते यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्याचा शब्द दिला,तसेच विजय रोकडे यांनीही सांगितले की सागर बडवे यांनी ५हजार कार्यकर्ते आणण्याचा शब्द दिला आहे, आणि तो पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.यामध्ये जिल्हा संघटक सागर बडवे, सोलापुर शहर अध्यक्ष राहुल पाटील, सोलापुर दक्षिण विभाग अध्यक्ष आकाश मोरे, सांगोला तालुका अध्यक्ष अविनाश बनसोडे, महेशकुमार डोके .पंढरपूर शहर संघटक शैलेश धट  शहरअध्यक्ष प्रतापसिंह भोसले व शाखाअध्यश गणेश पारडे अवधुत गडकरी ओंकार आंबले ओंकार चव्हाण  व सर्व कॉलेज विद्यार्थी उपस्थित होते.

add