पंढरीत उद्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 1 February 2020

पंढरीत उद्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह - महाराष्ट्र राज्य 'मराठा सोयरिक' ग्रुपच्या वतीने भव्य राज्यस्तरीय विनाशूल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे उद्या रविवार दि.2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत श्री संत जगत्‌गुरू तुकाराम महाराज मंगल कार्यालय इसबावी, जुना अकलूज रोड, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या विवाहनुरूप मुला-मुलींसह उपस्थित रहावे, असे आवाहन केले आयोजकांनी आहे.

विवाह जमविणे सध्याच्या काळात मोठी समस्या बनली आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी व्यावसायिक वधु-वर सूचक मंडळानी विवाह जुळविण्यासाठी दलालांनी कंबर कसली आहे. गरजवंत वधू व वर पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारून त्यांची लूट करण्याचा धंदा अनेकांकडून केला जात आहे. या लुटमार फसवणूक करणाऱ्याची गय न करता त्यांना धडा शिकविणार असल्याचे महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जवंजाळ पाटील (बुलढाणा) यांनी वधू-वर सुचक मंडळाच्या माध्यमातून गरजवंत पालकांची फसवणूक करणाऱ्या दलालांना पायबंद बसणार आहे. यासाठी विनाशूल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या बैठकीस अभिजीत पाटील, राजेंद्र कोरके-पाटील, डॉ.उदयसिंह पवार, रामदास गाजरे, संदिप गाजरे, विजय घालमे, दत्तात्रय यादव, राजेंद्र गुड, रविंद्र माने, नंदकुमार सटाले, दत्ताजीराव पाटील यांच्यासह मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

add