मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 Pandharpur Live-

      पंढरपूर (प्रतिनिधी):- मातोश्री सखुबाई कन्या प्रशअलेचे वार्षीक स्नेहसंमेलन आज दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम सज्जन चव्हाण (ब्रँच मॅनेजर-एस.बी.आय. लाईफ), सविता मधुलना (डेव्हलपमेंट मॅनेजर (एस.बी.आय. लाईफ), प्रशालेचे संचालक ह.भ.प. नागोदास महाराज सातपुते, संचालिका सौ. रुक्मिणीताई नागोदास सातपुते, मुख्याध्यापक हरिदास मगर, सांस्कृतीक विभाग प्रमुख केशव ठाकरे, पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. यानंतर रंगमंचाचे उद्घाटनही मान्यवरांच्या शुभहस्ते करयात आले व यानंतर स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमास प्रारंभ झाला.या कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्रातील कलेच्या सर्व पैलुंचे दर्शन घडविले. लोकगीत, सिनेगीत, देशभक्तीपर गीत, लावणी आदींसह विविध गीतांच्या तालावर विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य सादर करत आपल्या अंगी असलेल्या कला-गुणांचे सादरीकरण केले. ‘सासु-सुनेचे भांडण’ ही नाटिकाही यावेळी सादर झाली. या नाटिकेद्वारे प्रशालेतील नववीमधील विद्यार्थीनिनींनी आपली कला सादर केली. यावेळी उपस्थित पालक, शिक्षकवृंद व मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलेला भरभरुन  दाद दिली.  

 शाळेतील शिक्षक श्री. ठाकरे (सर),  श्री. शेडगे (सर), श्री. पाटसकर (सर), सौ. कारंडे (मॅडम), श्री.कापसे (सर), श्री.वेरुळकर (सर), श्री. घोडके (सर), श्री.बुधवंत (सर) यांनी सर्व विद्यार्थिनींना नृत्याचे धडे दिले होते. मुख्याध्यापक श्री.हरिदास मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.