भुवैकुंठ पंढरीत 10 एकर परिसरात निरंकारी समागमचे आयोजन


पंढरपूर लाईव्ह- अध्यात्मीक क्षेत्रात दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या पंढरपूर तिर्थक्षेत्रात निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 2 फेबु्रवारी रोजी निरंकारी संत समागम संपन्न होणार असल्याची माहिती पंढरपूर ब्रॅन्च मुखी गितांजली घोडके यांनी दिली.


निरंकारी मिशनच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच पंढरपूरच्या अध्यात्मिक पावन नगरीमध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे आगमन होत आहे. रविवार दि. 2 फेबु्रवारी रोजी येथील कराड रोड, विठ्ठल रूक्मिणी पॅलेस शेजारील, गौतम विद्यालयाच्या दहा एकराच्या भव्य मैदानावर सायं. 5 ते रात्री 8.30 यावेळेत संत समागम पार पडणारआहे. या समागमासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील अनेक भागातून हजरोंच्या संख्येने निरंकारी अनुयायी उपस्थित राहणार आहेत. 
निरंकारी मंडळ सोलापूर झोनच्या वतीने कार्यक्रम स्थळी जय्यत पुर्व तयारी सुरू असून सोलापूर झोनचे प्रमुख इंद्रपालसिंहजी नागपाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी मंडळ सोलापूर झोनमध्ये सर्व सेवादल व अनुयायी रात्रंदिवस सेवा कार्य करून कार्यक्रमाचे तयारी करत आहेत.पंढरपूर येथे होणार्‍या निरंकारी संत समागमास पंढरपूर परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पंढरपूरच्या ब्रॅन्च मुखी गितांजली घोडके यांनी केले आहे.