पंढरपूर नगरपरिषद व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने वृक्षारोपणPANDHARPUR LIVE -
      पंढरपूर नगरपरिषद व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने प्रशांतराव परिचारक नगर, कोर्टी रोड येथे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, मंदिर समिती सदस्य ह.भ.प.शिवाजीराव मोरे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, समाजसेवक नवनाथ रानगट, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, सामाजिक वनीकरणाचे तालुका वन अधिकारी किशोर आहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
              यावेळी बोलताना माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर नगरपरिषद व मंदिर समिती हा वृक्षारोपणाचा स्तुत्य कार्यक्रम राबवत असल्याबद्दल कौतुक केले. तसेच मंदिर समितीचे सदस्य व श्री.संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.शिवाजीराव मोरे यांनी सांगितले की, देहु-आळंदी पासुन पंढरपूर पर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. तसेच पंढरपूर शहरामध्ये ९८,९२३ झाडे लावण्याचा संकल्प केला असुन मंदिर समितीच्या माध्यमातुन व आमच्या संस्थेच्या माध्यमातुन आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शहरात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे.            वृक्ष लागवड करीत असताना नुसते वृक्ष न लावता ट्रीगार्डसह वृक्ष लावण्यात येत आहे. यासाठी सामाजिक वनीकरण, नगरपरिषद व मंदिर समिती मोठ्या प्रमाणात सहकार्य करित असल्याने हे वृक्ष लागवडीचे काम हाती घेतलेले आहे. तसेच स्वच्छ-सुंदर व हरित पंढरपूर करण्याचा संकल्प हाती घेतला असुन सर्वांच्या सहकार्यातुन निश्चितपणाने हा संकल्प सिद्धीस जाईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी.रोंगे सर, माजी नगरसेवक तुकाराम राऊत, उद्योगपती परमेश्वर खांडेकर, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, संदिप ननंदवार, नारायण शिंगण, अमोल डोके, बाळासाहेब थोपटे हे उपस्थित होते.