‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ उत्साहात संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 17 February 2020

‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ उत्साहात संपन्न


पंढरी नगरी सायकलमय... सायकलस्वारांच्या उत्साहाला उधाण!
                पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमध्ये आज रविवार दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी  ‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ उत्सहात संपन्न झाले. प्रदुषणमुक्त, इंधनविरहित आरोग्यसंपन्न भारतासाठी जिल्हा सायकल असोशिएशन सोलापूर व आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे मत यावेळी आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आयोजक सागर कदम यांनी व्यक्त केले.  या सायकल मॅरेथॉनच्या निमित्ताने अवघी पंढरी नगरी सायकलमय झालेली आढळून आली. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 1400 हून अधिक सायकलस्वारांच्या उत्साहाला यावेळी उधाण आल्याचे दिसून आले.
               प्रांताधिकारी सचिन ढोले, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, उद्योजक अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, आयर्न मॅन डॉ. चंद्रकांत मगर, डॉ. संगीता पाटील, राधेश बादले-पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, आयोजक सागर कदम, शेखर (बंटी) भोसले, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ झाला.
                  या मॅरेथॉन मध्ये डॉक्टर, वकील, इंजिनीअर, व्यापारी, उद्योजक, साहित्यीक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींसह अनेक महिला-भगिणी व लहान मुलांनी सहभाग नोंदवला होता.  या सर्वांचे 2 गटात विभाजन केले होते. संयोजनामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेसह 125 स्वयंसेवकांचे योगदान लाभले. 4 अ‍ॅम्ब्युलन्स सह 10 डॉक्टरांचेही योगदान लाभले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 6:30 वाजता या सायकल मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. येथून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, लिंकरोड मार्गे क्रांतीसिंह नाना पाटील चौक, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, कर्नल भोसले चौक, महात्मा बसवेश्‍वर चौक, भादुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त करण्यात आले.  14 वर्षाखालील स्पधकांचे मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, कर्नल भोसले चौक, महात्मा बसवेश्‍वर चौक, भादुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त करण्यात आले. 
मॅरेथॉननंतर सर्व सहभागी सायकलस्वारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
                हे मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आयोजन कमिटी सदस्य शेखर (बंटी) भोसले, ओंकार चव्हाण, गणेश निंबाळकर, सतीश माने, गणेश थिटे, गणेश जाधव, पिंटु कुंभार, अतुल लटके, सिध्दार्थ गुरव, माऊली साठे, ओंकार आंबले, आकाश पवार, नाना शिंदे, आनंद कथले, बाळासाहेब गोडबोले,चारुशीला कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. 


add