श्रीविठ्ठल मंदिरानजीकच्या प्रासादिक साहित्य दुकानदाराची आत्महत्या

पंढरपूर लाईव्ह वृत्त :- पंढरपूरमधील घोंगडे गल्ली येथे एकाने स्वत:च्या राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. सदर व्यक्तीचे श्रीविठ्ठल मंदिरानजीक प्रासादिक साहित्याचे दुकान आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कपिल काशीद (वय-42) रा. घोंगडे गल्ली यांनी आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. अधिक तपास हवालदार वाघमोडे हे करत आहेत.

कपील काशीद यांचे पंढरीतील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरानजीक रुक्मिणी पटांगण येथे प्रासादिक साहित्याचे दुकान असुन त्यांच्या पश्‍चात 4 मुली, 1 मुलगा, पत्नी व आई असा परिवार असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments