शिवजन्मोत्सव विशेष: केशरचनेत साकारलं छत्रपती शिवरायांचं रुप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 17 February 2020

शिवजन्मोत्सव विशेष: केशरचनेत साकारलं छत्रपती शिवरायांचं रुप

Pandharpur Live-
               पंढरपूर (प्रतिनिधी):- येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सबंध महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु आहे. याचंच औचित्य साधुन पंढरीतील सुप्रसिध्द सलुन कलाकार माऊली चव्हाण यांनी मोठ्या कल्पकतेने शिवछत्रपतींचं रुप केशरचनेत साकारलंय.  शिवरायाचं हुबेहुब रुप मोठ्या कलात्मकतेने एका व्यक्तीच्या डोक्यावरील केससंभारात कोरलं आहे.

              याबाबत बोलताना माऊली चव्हाण सांगतात, गेल्या अनेक वर्षापासून मी सलुनचा व्यवसाय करतोय. सिनेमा व मालिका वगैरे मधील सेलिब्रेटींच्या चित्रविचीत्र केसरचने सारखी आमची केसरचना करा अशी मागणी करणारे  गिर्‍हाईक आमच्याकडे येत असतात. परंतु वेडेवाकडे विचित्र केसरचनेचे प्रकार करण्यापेक्षा ज्याद्वारे सामाजिक संदेश देता येईल, महामानवांच्या थोर कार्याला मानवंदना देता येईल, व आपण इतरांपेक्षा कांही तरी वेगळं  करतोय असं समाधान लाभेल, अशी केसरचना करण्याकडे माझा कल असतो. सबंध महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींसाठीचा मोठा उत्सव म्हणजेच ‘शिवजन्मोत्सव’ हा सोहळा येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कणाकणात आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनामनात छत्रपती शिवरायांबद्दलचा आदर आणि प्रेम भरलेलं आहे. तरुणाईच्या नसानसातून छत्रपती शिवरायांचं शौर्य सळसळताना आढळून येतं, प्रत्येकाच्या हृदयात शिवछत्रपतींचं रुप कोरलेलं आहे. शिवजन्मोत्सवाचं  औचित्य साधुन आज केसरचनेमध्ये शिवरायांचं रुप साकारलं. असं मत माऊली चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे  व्यक्त केलंय.


                  आजच्या धकाधकीच्या दुनियेत अनेक कलाकार जन्माला येतात. असे अनेक कलाकार आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावतात. आपल्या कलेच्या माध्यमातून ते समाजहितासाठीचे अनेक संदेश देण्याचा प्रयत्नही करत असतात. माऊली चव्हाण यांचे ‘लई भारी फेे्रंडशीप जेन्टस् पार्लर’ हे केशकर्तनालयाचे दुकान पंढरीतील दाळे गल्ली येथे आहे. आपल्या हातातील कैची वस्तर्‍याच्या द्वारे  त्यांनी कलेचे अनेक उत्कृष्ट नमुने याआधीही दाखवुन दिले आहेत. आपल्याकडे येणार्‍या ग्राहकांच्या केसांमध्ये विविध प्रकारची चित्रे, व्यक्तिगत चित्रे, चिन्हे वगैरे ते रेखीव पध्दतीने कोरत असतात. पक्षीसंवर्धन, निसर्गसंवर्धन, स्वच्छतेचे महत्व आदींसह विविध सामाजिक संदेश आपल्या केशरचनेच्या कलेद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.


                  त्यांच्या या कलेद्वारे सादर केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे पंढरपूर शहर व तालुक्यातून सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व प्र तिभावंत व्यक्तींनी माऊली चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व दुरध्वनीद्वारे कौतुक करुन त्यांच्या कलेला दाद दिली आहे. त्यांच्या या कलेच्या उत्कर्षासाठी व त्यांना प्रेरीत करण्यासाठी सकल नाभिक समाज संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.add