पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने ४३ घंटागाडीचे उदघाटन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 1 February 2020

पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने ४३ घंटागाडीचे उदघाटनPandharpur Live Online -  
        पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील ओला व सुका कचरा गोळा करणेकामी   नविन ४३ घंटागाडीचे उदघाटन आमदार प्रशांत प्ररिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षनेते अनिल अभंगराव , पाणीपुरवठा सभापती गुरूदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती रेणुका घोडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर.यांच्या उपस्थित संपन्न झाला .यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले कि, पंढरपूर शहर कचरा मुक्त व कुंड मुक्त व्हावे ह्या हेतुने शहरामध्ये घंटागाडी चालु करण्यात आले आहे. या पुर्वी असणा-या घंटागाडीमध्ये प्लँस्टिचे ड्रम ठेवुन कचरा गोळा करण्यात येत होता परंतु ओळा व सुका कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या म्हणुन नगरपरिषदेने या वर्षी घंटागाडीचा ठेका देताना खास ओला व सुका कचरा गोळा करणारी घंटागाडी असणे  आवश्यक केल्याने या नव्या आधुनिक घंटागाड्या ठेकेदाराने खरेदी केल्या  आहेत यामुळे शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्यात मदत होणार आहे. तरी पंढरपूर शहरातील नागरीकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी तसेच कचराकुंड व कचरा  मुक्त होणाच्या दृष्टीने आपल्या घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीतच टाकावा कोणत्याही परिस्थित कचरा रस्यावर टाकु नये असे आवाहन केले. या वेळी नगरसेवक सुजित सर्वगोड संजय निंबाळकर,आदित्य फत्तेपुरकर,नगरसेविका सुप्रिया डांगे ,शंकुतला नडगिरे , ,मालोजी शेंबडे अमोल डोके, आरोग्याधिकारी डॉ संग्राम गायकवाड, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे व नागनाथ तोडकर , वरिष्ठ लिपीक अनिल अभंगराव, धर्मराज घोडके ,बसवेश्वर देवमारे , आरपीआय चे शहराध्यक्ष संतोष पवार नरेंद्र डांगे , हे उपस्थित होते.


add