पंढरपूर सिंहगड मध्ये सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-2020 उत्साहात संपन्न झालेय. याद्वारे विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीतून 350 हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता. पंढरपूर) येथे 29 फेब्रुवारी रोजी सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-2020चे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे सुभाष लेंगरे, शिवाजी कुपटे, भारत गदगे, ए. बी. कणसे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. ऋशिकेश देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-2020 मध्ये महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग, सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग आदी विभागात विंग्ज-2020 या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती उपयुक्त साहित्य, सौर उर्जा प्रकल्प, सोलर कार, दुचाकी वाहन, इंधन बचत, आधुनिक शेती असे विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीतून बनविलेले होते. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना रोख स्वरुपात बक्षीस, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोळवले व वैभवी कुलकर्णी यांनी केले तर प्रा. महेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments