जि.प. आदर्श प्राथमिक केंद्रशाळा उंबरे(पागे) येथे 'कलाविष्कार-2020' मध्ये चिमुकल्यांनी सादर केला बहारदार कलाविष्कार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 2 February 2020

जि.प. आदर्श प्राथमिक केंद्रशाळा उंबरे(पागे) येथे 'कलाविष्कार-2020' मध्ये चिमुकल्यांनी सादर केला बहारदार कलाविष्कार
Pandharpur Live -
"छोट्या मुलांचा बडा धमाका!"
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळा उंबरे(पागे) ता.पंढरपूर आयोजित शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात कलाविष्कार-2020 हा धमाकेदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेला बहारदार कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.


यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी नाचणारही आणि शिकणारही!हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.अर्चनाताई व्हरगर (सभापती पं.स.) यांचे शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, महारूद्र नाळे (BEO), डॉ.धनेश गांधी,अकलूज, डॉ.स्वप्निल शहा (अध्यक्ष, अकलूज रोटरी), तानाजी बागल (जिल्हाध्यक्ष स्वा.शे.संघटना), संगीताताई शिंदे (सरपंच), सचिन पाटील (तालुकाध्यक्ष स्वा.शे.संघटना) आदी मान्यवर उपस्थित होते.


*न भूतो न भविष्यती असा कलाविष्कार*

गणेश वंदना,महाराष्ट्राची लोकधारा, शेतकरी गीते, देशभक्तीपर गीते, लहानग्यांचे फनी डान्स, विनोदी बातम्या, दादा कोंडके स्पेशल, रिमिक्स, चित्तथरारक कसरती,रूद्रा स्पेशल आणि छत्रपती शिवरायांचा पोवाडा क्या बात,एक से बढकर एक आदीसह
*मुलांच्या कसदार अभिनयाने सजलेल्या, तब्बल ३२ कलाकारांचा सहभाग असलेला  'अफझलखानाचा वध ' ह्रदयस्पर्शी पोवाड्याने रसिकांची मने जिंकली!*


*ठळक वैशिष्ठ्ये*

भव्य स्टेज,8×12 LED Screen, खणखणीत Dolby System,सर्व इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई, शेकडो फुलझाडांनी सुशोभित शालेय परिसर करण्यात आला होता.
सर्व मान्यवरांचे शुभहस्ते *'सावित्री-ज्योती!'* व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या प्रेरणादायी वाटचालीचा इतिहास व्हिडिओच्या रूपाने दाखविण्यात आला.यामध्ये शाळेचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम,लाखो रुपयांचा मिळालेला लोकसहभाग,शाळेचा प्रवास उलगडताना भविष्यातील स्वप्नांचा संकल्पही व्यक्त केला गेला.


*गौरव*

*ज्यांच्या परिसस्पशाने शाळेने गगनभरारी घेतली..* त्या सर्व शिक्षकांचा यामध्ये सर्वश्री खाजप्पा बनसोडे सर मुख्याध्यापक, सहशिक्षक संतोष चव्हाण सर, संजय गर्जे सर, प्रविण इंगोले सर यांचा डॉ.धनेश गांधी व मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
*शिक्षक समिती तर्फेही...* खारे सर व सहकार्यांनी शिक्षकांचा गौरव केला.
शाळेच्या यशात सिंहाचा वाटा असलेले अध्यक्ष अमरभाऊ इंगळे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.


यावेळी शाळेच्या उत्कर्षास मदत करणार्या सर्वांचे यथोचित सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे अचूक व भव्यदिव्य नियोजन  अमरभाऊ इंगळे अध्यक्ष SMC यांनी शा.व्य.समितीच्या साथीने केले होते.

यावेळी विस्तार अधिकारी श्री.  खुळे , केंद्रप्रमुख सौ.मंगल भायगुडे, ग्रा.पं.चे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, अनेक सदस्य तसेच  पत्रकार सतीश काळे, लक्ष्मण जाधव व गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर,SMC चे सर्व सभासद, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, केंद्रातील अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते.कार्यक्रमास गावातील तरुण युवक युवती,पालक बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचलन अविनाश बांगर सर व संतोष चव्हाण सरांनी केले.  प्रशांत माळी सर, सिताराम इंगळे व प्रविण इंगोले सरांनी टेक्नीशियनची उत्तम भुमिका निभावली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गर्जे सर, प्रविण इंगोले सर,खाजप्पा बनसोडे सर व संतोष चव्हाण सर व शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.add