वक्तृत्व हे प्रयत्नसाध्य तंत्र आहे- अरविंद जोशी


 पंढरपूर—"आजच्या आधुनिक जगात वक्तृत्व व संवादकौशल्याची गरज वाढत आहे, वक्तृत्व हे प्रयत्नसाध्य असून श्रवण, वाचन, मनन व चिंतनातून हे तंत्र आत्मसात करून ही गरज आपण पूर्ण करु शकतो." असे मत दै.तरुण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी यांनी व्यक्त केले. ते अभिनव अकॅडमीने आयोजित केलेल्या नवव्या बॅचच्या समारोपप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवताचार्य वा.ना.महाराज उत्पात उपस्थित होते.
             याप्रसंगी बोलताना अरविंद जोशी पुढे म्हणाले, वक्ता हा जन्मजातच असतो असे नाही, तर तो घडावा लागतो. एक चांगला वक्ता होण्याची ज्याची इच्छाशक्ती असते, तो प्रयत्नपूर्वक चांगला वक्ता बनू शकतो. काय बोलावे, किती बोलावे, कुठे बोलावे हे कसे बोलावे यापेक्षा फार महत्वाचे असते, त्यामुळे या मर्यादा पाळणाराच एक चांगला वक्ता होऊ शकतो.

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रशेखर कवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षीय सूचना मनिषा गायकवाड यांनी मांडली तर धैर्यशील भोसले यांनी अनुमोदन दिले. प्रियांका नलबिलवार यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचा हेतू आपल्या प्रास्ताविकातून रमेश सरवदे यांनी विशद केला तर अकॅडमीचे संचालक मंदार केसकर, डाॅ.औंदुबर तळेकर व शेखर कोरके यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. शांताराम गाजरे, राजेंद्र गिड्डे व अभिजीत गायकवाड या प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. अभ्यागत व्याख्याते डाॅ.सचिन लादे यांनी आपल्या मनोगतातून अभिनव अकॅडमीच्या कार्यामागील भूमिका व प्रेरणा स्पष्ट केली.
            कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विठ्ठल— रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांनी वक्तृत्वाचे महत्त्व सांगून वक्ता होण्यासाठी आवश्यक असणार्‍या गुणांची चर्चा केली. अध्यक्षस्थानावरुन बोलताना वा.ना.महाराज उत्पात यांनी वक्त्याने बोलताना कोणती काळजी घ्यायला हवी याबाबतची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
          याप्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. याचे वाचन अभ्यागत व्याख्याते सोमनाथ गायकवाड व मैत्रेयी केसकर यांनी केले. शेवटी आभार सरस्वती मोहिते यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा व्होरा, प्रियांका नलबिलवार व संतोष पाटील यांनी केले.
         याप्रसंगी शिवदास भिंगे गुरूजी, डाॅ.कैलास करांडे सर, डाॅ.आनंद भिंगे, प्रताप चव्हाण, ज्ञानेश्वर मोरे, डॉ. महेश देशपांडे, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ. अरुण मेणकुदळे, तुकाराम खंदाडे, सुनिल जगताप, कृष्णा सुरशेटवार, विजय कुलकर्णी, मानसीताई केसकर, व्दारका लादे, कविता गायकवाड,  सौरभ थिटे-पाटील, प्रवीण देशपांडे,गिरीश भिड़े,चंद्रकांत देसाई, अभिजीत मारकड, आनंद नगरकर, गणेश लांबोरे, अशोक महामुरे, नवनाथ शिंदे, संतोष महामुनी, महेश ब्रेदर, बाळकृष्ण डिंगरे, ज्ञानदा रत्नपारखी, अॅड.विजय जाधव, अविनाश माने व अनेक वक्तृत्वप्रेमी उपस्थिती होते.