धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचा हिंगोलीत डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ


Pandharpur Live Online- 
परळी वैजनाथ / हिंगोली (प्रतिनिधी) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून धनंजय मुंडे आरोग्य मित्र या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आरोग्य मित्र योजनेचे पदाधिकारी गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठीचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहतील असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले. 


    
     हिंगोली येथे  शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रमुख डॉ.संतोष मुंडे यांच्या उपस्थितीत हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे आरोग्य मित्र या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.तसेच विविध पदांवर ‍अाज निवड प्रक्रिया करण्यात आली.  यावेळी बोलतांना पुढे डॉ.मुंडे म्हणाले की,  


या योजनेंतर्गत शासकीय, मुंबई व पुणे येथील मोठ्या मोठ्या धर्मार्थ रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया (कॅन्सर, ब्रेन ट्युमर, हार्ट सर्जरी, डोळ्याचे ऑपरेशन, हाडांचे ऑपरेशन इ) तसेच अनेक नानाविध रोगांचे उपचारासाठी व ग्रामीण भागातील व शहरातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसृती, कुटुंब नियोजन ऑपरेशन व सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी मदत करणे. 

तसेच दवाखान्यात दाखल करणे. गावोगावी आरोग्याची जनजागृती करणे. रक्तदान शिबीर घेणे असे अनेक कामे हे "आरोग्य मित्र" म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे काम असेल. ज्याला समाज सेवेची आवड आहे अशा व्यक्ती निवड करण्यात आली आहे तसेच हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राभर हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवणार असून याव्दारे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य मित्रांची निवड करणार असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी मनोगत व्यक्त करतांना व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली नगर परिषदचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे ,जिल्हा सरचिटणीस  बि डी बांगर ,कमलेश यादव ,रशीद तांबोळी  ,मनोज बांगर , आरळकर , इरफान पठाण, असिफ गौरी, महेंद्र धबाले ,संतोष भालेराव ,योगेश डहाळे ,डॉ प्रशांत घुगे, सुरज बांगर ,डुडू बांगर  ,वैभव आघाव  ,दशरथ गुठे ,निवास घुगे  विकास सोनटक्के  व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.