राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 16 February 2020

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Pandharpur Live- 
        मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती
अ.क्र
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
1
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
2
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये
(मानचिन्ह वप्रशस्तीपत्र)
3
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
4
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
5
यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
7
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह</sp
...

add