आता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 25 February 2020

आता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा कामकाजाचा निर्णय लागू करावा. पुणे जिल्हा परिषदेने याबाबत प्रस्ताव तयार करून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारार्थ पाठवावा, अशा सुचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत.

जिल्हा परिषदेत बारामती लोकसभा मतदार संघासाठी आरोग्य विभागाची आढावा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, शिक्षण समिती सभापती, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पाच दिवसाचा आठवडा करण्यात आल्याबाबत चर्चा सुरू होती. यावेळी प्राथमिक शाळांसाठी देखील हा निर्णय लागू करण्याबाबत चर्चा झाली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच शाळांना पाच दिवसाचा आठवडा लागू करता येईल, का याचा विचार करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा असेल तर शिक्षकांनाही लागू करता येईल. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ व कष्ट वाचतील. तसेच वाहतुकीसाठी लागणारे इंधनाचीही बचत होईल, असे मत सुळे यांनी मांडले. पाच दिवसांचा आठवडा केल्यास अभ्यासक्रम बसणार नाही, व तासिका पुर्ण होणार नाहीत, शाळांना उन्हाळा आणि दिवाळी या काळात सुमारे अडीच महिना सुट्ट्या असतात. त्यामुळे शाळांना हा नियम लागू नाही, असे सांगण्यात आले.

खासदार सुळे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएससी) शाळांमध्ये पाच दिवसाचा आठवडा आहे. त्यांच्या एवढा अभ्यासक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांना नाही. मग अभ्यासक्रम का पुर्ण होणार नाही, शिवाय अनेक शाळांना शनिवारी सकाळची अर्धा दिवसच शाळा असते, अशी भुमिका मांडली. त्यामुळे शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार करावा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सादर करावा, अशा सुचना खासदार सुळे यांनी दिल्या आहेत.

add