सत्ता गेली पण सत्तेची मस्ती गेलेली नाही!- रुपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकारांची केली कानउघाडणी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 3 February 2020

सत्ता गेली पण सत्तेची मस्ती गेलेली नाही!- रुपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकारांची केली कानउघाडणी


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन पुणे: तहसीलदार मॅडमना हिरॉइन असं संबोधणाऱ्या भाजपा नेते बबनराव लोणीकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी शाब्दिक चपराक लगावत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जालना येथे बोलताना जीभ घसरली. याची तत्काळ दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लोणीकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. राज्यातील जिजाऊ-सवित्रींच्या बेटी या हिरोईन आहेतच पण तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साफ करायला मला जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा चाकणकर यांनी लोणीकरांना दिला.

सत्ता गेली पण सत्तेची मस्ती गेलेली नाही. त्यामुळे लोणीकर यांनी बोलताना भान ठेऊन जबाबदारीने वक्तव्य करण्याचा सल्ला रुपालीताई चाकणकर यांनी भाजपा नेत्यांना दिला.
तसेच स्त्रियांसाठी अवमानकारक या विधानाचा योग्य समाचार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी घेतला व लोणीकरांनी २४ तासांच्या आत माफी मागावी असे खडसावले.


add