ग्रामपंचायतीतूनच होणार सरपंचांची निवड...विधानसभेत विधेयक मंजूर


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल होणार आहे.

थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसते, अशा असंख्य तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यपालांच्या नकारानंतर महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत सदस्यांतूनच सरपंच निवडीची तरतूद असलेले विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवले आणि आवाजी मतदानाने ते मंजूरही झाले. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

Post a Comment

0 Comments