पुण्यात टोळक्यांचा धुमाकूळ.... ४० वाहनांची तोडफोड, जाळपोळ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 2 February 2020

पुण्यात टोळक्यांचा धुमाकूळ.... ४० वाहनांची तोडफोड, जाळपोळ


Pandharpur Live Web- पुण्याच्या सहकार नगरमध्ये काही टोळक्यांनी मध्यरात्री प्रचंड धुमाकूळ घालत सुमारे ४० वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. या टोळक्याने रिक्षा, टेम्पो, बाइकसह रस्त्यावर मिळेल त्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या टोळक्याने काल मध्यरात्री पुण्यातील विविध भागात ही तोडफोड केली. पुण्याच्या सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. मध्यरात्री टोळक्यांनी तुफान राडा करत गोंधळ घालत दहशत निर्माण केली. पुण्यापाठोपाठ निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अजंठा नगर येथे दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.  


त्यामुळे निगडीतही दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या टोळक्यांनी रस्त्यावर दिसेल त्या वाहनांना लक्ष्य केलं. रिक्षा, बाइक, टेम्पोसह सायकलचीही तोडफोड करत या वाहनांना आगी लावल्या. या टोळक्याने वाहनांच्या काचा फोडल्या असून रिक्षाचे सीटही फाडले आहे. काही वाहनांच्या टायरमधील हवाही काढून घेण्यात आली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे वाहनचालकांनी सहकार नगर आणि अजंठा पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात इसमांविरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून या टोळक्यांचा शोध घेत आहेत. सहकार नगर आणि अजंठा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा परस्पर संबंध आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

add