आरुष आर्वेचा ' स्मार्ट की' स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 12 February 2020

आरुष आर्वेचा ' स्मार्ट की' स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक


Pandharpur Live-
 नुकत्याच घेण्यात आलेल्या स्मार्ट कि स्पर्धा परीक्षेत आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर येथील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आरुष राहुल आर्वे याने १०० पैकी ८८ गुण प्राप्त करीत पंढरपूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवीत उज्वल यश संपादन केले आहे.कोल्हापूर येथील 'स्मार्ट की' या बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 
      हे यश मिळविणेसाठी शाकंबरी क्लासच्या शिक्षिका अर्चना पुजारी व आई प्रणिता,वडील राहुल आर्वे यांचे मार्गर्शन लाभले.आदर्श प्रशालेच्या मुख्याध्यापिका घंटे यांच्याहस्ते सत्कार करून प्रशालेच्या वतीने आरुष आर्वे याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.      

No comments:

Post a Comment

Pages