स्वेरीमध्ये संभाषण कौशल्य आणि रोजगार कौशल्य यावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 29 February 2020

स्वेरीमध्ये संभाषण कौशल्य आणि रोजगार कौशल्य यावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Pandharpur Live-
पंढरपूर- स्वेरीमध्ये रुबिकोन हेल्थ केअर प्रा. लिमी. पुणे यांच्या तर्फे संभाषण कौशल्य (कम्युनिकेशन स्कील) आणि रोजगार कौशल्य (एंप्लॉयबीलीटी स्कील) या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.

          गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी अंतर्गत असलेल्या एम.बी.ए., बी. फार्मसी आणि डी. फार्मसीमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी  कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने  प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांच्या नेतृत्वखाली एमबीए विभागात कांचन औटी, बी.फार्मसीमध्ये अश्विनी देशपांडे, अनुराग साळवे व डी. फार्मसीसाठी भक्ती फट्टे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.कार्यशाळेत संस्थात्मक संरचना, समुह चर्चा, सादरीकरण कौशल्ये, ई-मेल शिष्टाचार, ग्रूमिंग, वैयक्तिक मुलाखत, मुलाखतीत करा आणि करू नका या  विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

 प्रा. विजय चाकोते यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. रुबिकोन हेल्थ केअर प्रा. लिमी. पुणे या कंपनीने तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी संभाषण कौशल्य व रोजगार कौशल्य या मध्ये पहिल्या दिवशी स्वतःची ओळख कशी करून द्यायची, स्वतःचे अनुभव, आपण केलेले कार्य, स्वतःच्या गुणवत्तेचा मागोवा याबद्धल माहिती देताना सादरीकरण करत असताना नेमक्या कोणकोणत्या चुका प्रकर्षाने टाळाव्यात याची महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ‘रोल प्ले’ ही अॅक्टिव्हीटी घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांचे विविध गट पाडून समूह चर्चा आयोजित केली आणि या सांघिक चर्चेतून निर्माण होणाऱ्या नवीन विचाराद्वारे प्रगती कशी साध्य करता येईल याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःतील सामर्थ्य ओळखून ते कसे सादर करावे? आणि त्यातून प्रेरणा कशी घेता येईल, यामुळे कंपनीमध्ये कामगारांकडून अधिकाधिक कामे कशी करून घेता येतील याबाबत मार्गदर्शन केले. संभाषण कौशल्याबद्धल बोलताना आपण भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे? याद्वारे समोरील ग्राहक आपल्या कंपनीचे उत्पादन अधिकाधिक कसे खरेदी करू शकेल याचीही माहिती दिली. कार्यालयीन मेल पाठविताना घ्यावयाची काळजी यावर देखील मार्गदर्शन केले. प्रा. रामदास नाईकनवरे व प्रा. प्रज्ञा साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार समन्वयक प्रा. ज्योती मोरे यांनी मानले.

add