मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन... माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही.. वारकरी परिषदेला पवारांचं उत्तर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 8 February 2020

मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन... माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही.. वारकरी परिषदेला पवारांचं उत्तर


Pandharpur Live Online- 
मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन, माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, मला कुणाच्या परवानगीची गरज लागत नाही. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला उत्तर दिलं आहे.

जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आळंदीत आले होते. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रीय वारकरी परिषदने केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो. राजकारणात आम्ही आहोत म्हणजे अखंडपणे प्रसिद्धीशिवाय आम्हाला काही दिसत नाही असा गैरसमज आहे. पण त्या गैरसमजाकडे मी जात नाही आणि जाऊ इच्छित नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

शरद पवार हे देवाला मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलवू नका, असं राष्ट्रीय वारकरी परिषदेनं म्हटलं होतं.

No comments:

Post a Comment

Pages