विठूरायाच्या चरणी स्वरसाधनेच्या वतीने ‘ताल-सुर-लय’ यांची बरसात होणार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 7 February 2020

विठूरायाच्या चरणी स्वरसाधनेच्या वतीने ‘ताल-सुर-लय’ यांची बरसात होणार


Pandharpur Live-
पंढरपूर प्रतिनिधी
संगीताची राजधानी विठूरायाच्या नगरीमध्ये 31वा संगीत महोत्सव पंढरपूरमध्ये आयोजित होत आहे या महोत्सवाचे उद्घाटन मा आमदार प्रशांत परिचारक मा श्री विठ्ठल जोशी मा. सुधाकरपंत परिचारक.कार्याध्यक्ष वा.ना.उत्पात. स्वरसाधनेचे  कार्यवाहक श्री पुरषोत्तम खडके बंधू मा.प्रदिप भडगांवकर मा.मिलिंद जोशी.वसुधा काणे.यांचे शुभहस्ते होणार असून गेले 31 वर्ष स्वरसाधना व पंढरपूर अर्बन बँक संयुक्त विद्यामाने अखंडीत चालु असणारा संगीत महोत्सवात आतापर्यत अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

दिनांक 14/15/16/फेब्रुवारी या कालावधी मध्ये श्री संत तुकाराम भवन येथे सायं6:30वा.आयोजन केले असून शुक्रवार दिनांक 14फेब्रुवारी ख्यातनाम गायिका सायली तळवलकर यांचे शास्त्रीय व सुगम गायन साथसंगत तबला यशवंत वैष्णव हार्मोनियम सुरेश फडतरे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांची साथसंगत लाभणार आहे. त्यानंतर आंतराष्ट्रीय किर्तीचे सतारवादक पं निलाद्रीकुमार यांच सतारवादन तबलासाथ यशवंत वैष्णव यांची लाभणार आहे शनिवार दिनांक 15फेब्रुवारी कर्नाटक येथील ख्यातनाम गायिका सुजाता गुरव यांचे शास्त्रीय व अभंगगायन तबलासाथ विनय कुलकर्णी हार्मोनियम हरिदास लिमकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांची लाभणार आहे.

े हर्ष नारायण यांचे सारंगीवादन यांना तबला साथ  रुपक पवार यांची लाभणार आहे.रविवार दिनांक 16फेब्रुवारी उस्ताद रशीदखान यांचे शिष्य नागेश आडगांवकर यांचे शास्त्रीय व ठुमरी गायन तबला रविंद्र क्षीरसागर हार्मोनियम ओंकार पाठक यांची साथ लाभेल यानंतर स्मरणिका प्रकाशन मा उमेशजी परिचारक यांचे शुभहस्ते होईल व त्यानंतर युवा सरोदवादक अभिषेक बोरकर तबलासाथ अजिंक्य जोशी या कार्यक्रमाने संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी पंढरपूर व पंचक्रोशीतील सर्व कला रसिक प्रेमींनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे सदर महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रदिप भडगावकर. मिलिंद जोशी.प्रवीण खडके.नंदन.खडके.ज्ञानेश्वर दुधाणे.अविनाश.देशपांडे.सुहास इचगावकर.अभय झांबरे.आदी परिश्रम घेत आहेत.


add